वाचन
वाचन पत्रिका : वाचन करताना महत्वाच्या काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
पूर्व तयारी -
- काय वाचणार ते समजून घ्या.
- जे वाचणारे त्याविषयीचे पूर्वज्ञान आहे का, पाहा.
- प्रश्न विचारा ( स्वत:ला , आपल्या मित्रमैत्रिणीला )
वाचताना -
- वाचनाचा तुमचा हेतु स्पष्ट हवा. (माहिती मिळविण्यासाठी, मनोरंजांनासाठी, ज्ञान वाढविण्यासाठी)
- वाचताना लक्षपूर्वक वाचा.
- वाचताना जोरात वाचू नका. जे वाचत आहात, ते कठीण आहे की सोपे आहे हे समजून घेऊन वाचा. त्यामुळे मोठयाने वाचताना अडखळायला होणार नाही.
- जे वाचत आहात त्याविषयी पूर्वी असचं काही वाचल्याचं आठवत का पाहा. किंवा त्याची मदत होते का पाहा.
वाचल्यानंतर -
- आवश्यक तिथे पुन्हा वाचा.
- आठवा आणि जे वाचले ते क्रमवार स्वतच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा.
- जे वाचले त्याचा आणि तुम्ही आजवर घेतलेल्या अनुभवांचा संबध आहे का ?
- लेखकाने कसे लिहिले आहे असे तुम्हाला वाटते ? उदा. लेखकाने शब्दरचना, परिच्छेद, भाषेचा वापर यावर तुम्ही तुमच्या शब्दात टिपणी तयार करा.
वाचन वाढवल्याने तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि वाचनाने विचारांना योग्य दिशा मिळेल. हे नेहमी लक्षात ठेवा .
No comments:
Post a Comment